¡Sorpréndeme!

शनिवारवाड्याचा धसका घेतल्यानं दुसऱ्या बाजीरावानं बांधला विश्रामबाग वाडा | गोष्ट पुण्याची : भाग १५

2021-11-20 838 Dailymotion

३० ऑगस्ट १७७३ ला शनिवार वाड्यात नारायणरावांचा खून झाला. त्यानंतर २७ ऑक्टोबर १७९५ ला सवाई माधवराव यांनी देखील शनिवार वाड्यामध्ये आत्महत्या केली. यानंतर जेव्हा दुसरे बाजीराव गादीवर बसले तेव्हा त्यांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी पुण्यात बुधवार वाडा, शुक्रवार वाडा आणि विश्रामबागवाडा हे तीन वाडे नव्याने बांधले आणि आलटून पालटून ते या वाड्यात राहू लागले. आज आपण त्यातल्याच विश्रामबाग वाड्याविषयी जाणून घेऊ